आवताडे शुगरचा हंगाम संपला, चार लाखांचा गाठला टप्पा : चेअरमन संजय आवताडे

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथे आवताडे शुगर्सने आपल्या द्वितीय गळीत हंगामात चार लाख चार हजार ४४४ मेट्रिक टन उसाचे गाळप करून तीन लाख ७८ हजार १०० साखर पोती उत्पादित केली. कारखान्याने एक नोव्हेंबर रोजी गळीत प्रारंभ केला होता. तेव्हापासून पाच मार्च रोजी हंगामाची सांगता करत असल्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी केली. हंगाम सांगता समारंभ युवक नेते सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते झाला.

यावेळी सोमनाथ आवताडे म्हणाले की, शेतकऱ्यांना खासगी कारखानदारीत सर्वाधिक पहिला हप्ता २७११ रुपये दर दिला आहे. यंदा ऊस वाहतुकीमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक काढले असून वाहतूक ठेकेदारांना बक्षिसे देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक शाम पवार, कार्यकारी संचालक मोहन पिसे, भारत निकम, सरव्यवस्थापक (टेक्नि.) सुहास शिनगारे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here