ज्ञानेश्वर कारखान्याला बेस्ट परफॉर्मन्ससाठी पुरस्कार प्रदान

अहमदनगर : भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोल्हापूर येथील भारतीय शुगर संशोधन संस्थेचा देश पातळीचा ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स को ऑपरेटिव्ह शुगर मिल’ ॲवार्ड हा पुरस्कार मिळाला. कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले मार्गदर्शनाखाली भेंडा कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याने सहकार क्षेत्रात नाव उंचावले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कारखान्याचे तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले, व्हा. चेअरमन पांडुरंग अभंग, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, संचालक काकासाहेब नरवडे, ॲड. हिम्मत देशमुख आदीं उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here