उसामध्ये आंतरपिके घेण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

बागपत : दोघट विभागात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत भैसाना साखर कारखान्याच्या ऊस विभागाच्या संचालकांनी शेतकऱ्यांना उसासोबत इतर आंतरपिकांबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये मोहरीचे उत्पादन आणि औषधांवर मिळणाऱ्या अनुदानाबद्दल माहिती देण्यात आली.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी तेजपाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत भैसाना कारखान्याचे ऊस विभागाचे व्यवस्थापक योगेंद्र डबास यांनी सांगितले की, यावेळी कारखान्याच्यावतीने को १५०२३ आणि ०११८ प्रजातीच्या उसाची लागवड केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना पूरक पिके घेता येतील. त्यापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अधिक भर पडू शकते. तसेच पूरक पिके घेवून शेतकरी अनुदानही मिळवू शकतात. या बैठकीला राजीव, योगेंद्र, इरफान, कुलदीप, अरविंद, प्रवीण, चंद्रपाल, राजेंद्र, महेंद्र, जुनैद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here