आवताडे शुगर २७११ रुपये पहिला हप्ता देणार : चेअरमन संजय आवताडे

सोलापूर : यंदा ऊसाच्या तुटवड्यामुळे जास्तीत जास्त दर जाहीर करण्यात मंगळवेढा तालुकाही मागे राहिलेला नाही. तालुक्यातील कारखान्यांनी आधी जाहीर केलेले दर पुन्हा वाढवण्यास सुरुवात केली आहे. आवताडे शुगरने यापूर्वी ऊस दराचा पहिला हप्ता २५५१ रुपये जाहीर केला होता. मात्र, इतर कारखान्यांनी जादा दर जाहीर केल्याने आवताडे शुगरने ही मागे न राहता २७११ रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देऊन शेतकऱ्यांचे समाधान करण्यात येईल, असे चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दराची स्पर्धा लागली असून पंढरपूर तालुक्यानंतर मंगळवेढा तालुकाही यात मागे राहिलेला नाही. मंगळवेढा तालुक्यातील दामाजी शुगरने २५११ रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. भैरवनाथ शुगरकडून २७२५ रुपये तर युटोपियन शुगर कडून २७११ पहिली उचल जाहीर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आवताडे शुगरने नवा दर जाहीर केला आहे. याबाबत चेअरमन संजय आवताडे म्हणाले की, गेल्या वर्षी पहिल्या गळीत हंगामामध्ये ‘आवताडे शुगर’ने एकरकमी २३५० रुपये ऊस दर दिला होता. यंदा दुसरा गळीत हंगाम असून २७११ पहिली उचल जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना समाधान वाटेल असा ऊस दर मिळेल, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here