ऊस सर्वेमध्ये हालगर्जीपणा सहन केला जाणार नाही : जीएम

96

आजमगढ : साखर कारखाना साठियांवर परिक्षेत्रातील ऊस  शेतकर्‍यांच्या ऊस  पीकाच्या सर्वेचे आता काहीच दिवस राहिले आहेत. पण आतापर्यंत ऊस  सर्वेचे काम पूर्ण झाले नाही. कारखान्याचे व्यवस्थापक (जीएम) प्रताप नारायण यांनी पर्यवेक्षकांना कडकआदेश  दिले आहेत की, त्यांनी लवकरात लवकर ऊस  सर्वे पूर्ण करावा. ऊस  सर्वे मध्ये कोणत्याही प्रकारचा हालगर्जीपणा चालणार नाही.  ते म्हणाले, शेतकर्‍यांच्या ऊस  पीकाचा सर्वे 1 मे पासून सुरु झाला आहे. शासनाने सर्वे कार्य 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शेतकर्‍यांच्या पीकाचे सर्वेक्षण करण्याबरोबरच घोषणा पत्राचे प्रारुप भरुन जमा करायचे आहे. तसेच खसरा खतौनी ची नक्कल आणि बँक पासबुक ची फोटोकॉपी जमा करायची आहे. जेणेकरुन ऊस  शेतकर्‍यांना शासनाच्या सुविधांचा पूर्णपणे लाभ घेता येईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here