टोळ धाडीच्या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका ऊस शेतकऱ्यांना बसणार

अमिलो (आजमगढ़) : टोळ दलाच्या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका ऊस शेतकऱ्यांना बसणार असल्याने ऊस शेतकरी अधिक चिंतेत आहेत. या पिकाचा विमा नसतो. अशा परिस्थीतीत टोळ दलाने ऊस शेतीवर हल्ला केला तर ऊस शेतीचे खूप मोठे नुकसान होईल. अधिकाऱ्यांना ऊस शेती वाचवण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे.

ऊस विभागाने ऊसाच्या पिकावर टोळ दलाच्या आक्रमणाची शंका व्यक्त केली आहे. यासाठी औषधांपेक्षाही सतर्कता आवश्यक आहे. जिल्हा ऊस अधिकारी अशरफी लाल यांनी सांगितले की, तांदूळ आणि गव्हाच्या पिकाचा विमा असतो. पीकाचे नुकसान झाल्यावर त्या नुकसानीची नुकसान भरपाई दिली जाते. ऊस पीकाचा विमा नसतो. जर ऊस पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. अशा मध्ये शेतकऱ्यांनी ऊस शेताच्या आसपास थाळी आणि ढोल वाजवाव. त्यांनी शेतकऱ्यांनाही जागरुक राहण्याचा सल्ला दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here