अजरबैजानकडून २०२१ च्या पहिल्या सहामाहीत साखर निर्यात दुप्पट

अजरबैजानने २०२१च्या पहिल्या सहामाहीत आपली साखर निर्यात दुप्पट केली आहे. फळे, भाजीपाला आणि चहाच्या निर्यातीमध्येही वाढ झाली आहे.

साखर पावडरीच्या निर्यातीमध्ये जानेवारी ते जून २०२१ पर्यंत १८,१९९ टनाची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अहवालकाळात अजरबैजानकडून २० मिलियन डॉलर मुल्याच्या सुमारे ३६,९०० टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७.७ मिलियन डॉलर किमतीची सुमारे १८,८०० टन साखर निर्यात करण्यात आली होती. याशिवाय, राष्ट्रीय निर्यात धोरणानुसार, २०२०च्या तुलनेत २०२५ पर्यंत अजरबैजानकडून तेलाव्यतिरिक्त इतर पदार्थांची निर्यात दुप्पट करण्यात येणार आहे. याचे मूल्य ३.७ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचविण्याच्या योजनेवर देशाने काम सुरू केले असल्याचे दिसून येत आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here