शेतकर्‍यांवर कर्ज घेण्याची वेळच येवू नये: आमदार बच्चू कडू

मुंबई : मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील शेतकर्‍यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्यापेक्षा, शेतकर्‍यांवर कर्जच घेण्याची वेळ येवू नये अशी धोरणे राबवणे गरजेचे असून शेतकर्‍यांना हमीभाव मिळणे आवश्यक असल्याचे, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने बद्धल बोलताना प्रहार संघटनेचे अध्यक्ष आम. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात देखील दिली जाणारी मदत वाढवणे गरजेचे आहे. या कर्जमाफीचा कोरडवाहू शेतकर्‍यांना विशेषत: विदर्भ, मराठवाडा या भागातील कापूस, धान उत्पादक शेतकर्‍यांना फायदा होईल.

ते म्हणाले, पेरणी ते कापणी या कामाचा समावेश मनरेगात करावा. शिवाय सरकारकडून 75 टक्के शेतकर्‍यांचा सात बारा कोरा होण्याची आपेक्षा आहे. मात्र फळ उत्पादन व बागायतदार शेतकर्‍यांसाठी वेगळे धोरण ठरवावे लागेल, अशी आपेक्षाही आम. बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here