साखर कारखान्याच्या बगॅसच्या ढिगाला आग

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

गाडरवारा (मध्य प्रदेश) : चीनी मंडी 

नर्मदा साखर कारखान्याच्या सालीचौका येथील बगॅसच्या गोदामाला अचानक आग लागली होती. साखर कारखान्यासह तीन ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. उसापासून रस काढल्यानंतर तयार होणाऱ्या चिपाडांपासून बगॅसची निर्मिती होते. बॉयलर चालविण्यासाठी आवश्यक असल्याने कारखान्यांकडून बगॅसचा साठा केला जातो.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्याने येथे मोठ्या प्रमाणावर बगॅसचा साठा केला होता. आग लागल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे ती पसरली. आगीची माहिती मिळताच एसडीएम सोनम जैन, एसडीओपी एसआर यादव, टीआई, नायब तहसिलदार, सालीचौका पोलिस घटनास्थळी आले. पाठोपाठ सालीचौका नगर परिषद, गाडरवारा नगरपालिका, बनखेडी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, वाऱ्यामुळे यामध्ये अडथळे येत होते.

गोदामाजवळच शेती असल्याने आग पसरण्याचा धोका होता. आगीत सुमारे दोन हजार टन बगॅस जळाला. बनखेडी, सालीचौका आणि गाडरवारा येथील अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. यापूर्वीही अनेकदा कारखान्याच्या बगॅसला आग लागण्याचे प्रकार घडले आहेत.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here