तांत्रिक बिघाडामुळे बागपत कारखाना चार तास बंद

बागपत : बागपत साखर कारखाना तांत्रिक बिघाडामुळे चार तास बंद राहिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मेरठ-बागपत महामार्ग अडवून आंदोलन केले. त्यामुळे मेरठ-बागपत मार्गावरील वाहतूक चमरावल रोडवरून वळविण्यात आली. या मार्गावरून जाणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.

बागपत साखर कारखान्यात रात्री सुमारे तीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रशासनाला कारखाना बंद करावा लागला. कारखाना बंद झाल्यानंतर परिसरात आणि मेरठ-बागपत महामार्गावर ऊसाने भरलेल्या गाड्या, ट्रॅक्टर-ट्रॉलींची रांग लागली. ऊस घेऊन वजनासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कारखाना सुरू करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली.
शेतकऱ्यांनी मेरठ-बागपत महामार्गावर ट्रॅक्टर-ट्रॉली लावून महामार्ग रोखला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. तर वाहने चमरावल रस्त्यावर वळविण्यात आली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारखाना पुन्हा सुरू झाला.

या प्रकाराबाबत कारखान्याचे महाव्यवस्थापक आर. के. जैन यांनी सांगितले की, कारखान्यात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे चार तास गाळप बंद राहिले. ते आता पूर्ववत झाले आहे. अरविंद, अंकित, देवेंद्र, सुखपाल, रवि, पवन, रविंद्र, अनुज आदींसह शेतकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here