उंदरामुळे सात तास बंद राहिला उत्तरप्रदेश मधील साखर कारखाना

बागपत(उत्तरप्रदेश) : बागपत मध्ये सहकारी कारखाना रमाला मध्ये एका उंदरामुळे बराच वेळ कारखाना बंद करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, एक उंदीर टर्बाइन च्या ट्रांसफार्मर मध्ये घुसला, ज्यामुळे शॉर्ट सर्किट झाले. यामुळे विज पुरवठा ठप्प झाला आणि कारखाना सात तास बंद करावा लागला.
कारखाना बंद झाल्यामुळे रस्त्यांवर ऊसाने भरलेल्या गाड्यांची लांबच लांब रांग लागली. ऊस शेतकर्‍यांनी कारखान्याविरोधात नाराजी व्यक्त केली. कारखाना गेटवर गोंधळ केला.

ऊस गाळप सुरु आहे. यासाठी शेतावरुन ऊस घेवून आलेल्या शेतकर्‍यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारखान्याच्या इंजिनिअरकडून व्यवस्थीत वीज पुरवठा होईपर्यंत तब्बल सात तास शेतकर्‍यांना प्रतिक्षा करावी लागली. उत्तम ग्रुपचे साइट इंचार्ज अश्‍विनी तोमर यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी 6 वाजता कारखान्याच्या टर्बाइनच्या खाली असणार्‍या ट्रासफॉर्मरमध्ये उंदीर घुसला. तारेचा स्पर्श झाल्याने शॉर्ट सकीर्ट झाले आणि विज पुरवठा बंद करावा लागला. आता कारखान्याच्या इंजिनिअर्सनी ही परिस्थिती आटोक्यात आणली आहे आणि कारखान्यातील गाळप पुन्हा सुरु होत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here