रशियाकडून साखरेसह इतर वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध लागू

मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांदरम्यान सुरू असलेल्या संघर्षाचा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. रशियाच्या सरकारने ऑगस्ट अखेरपर्यंत धान्य आणि साखरेच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य आशियाई क्षेत्रात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. देशातील अन्नधान्य सुरक्षा लक्षात घेऊन आणि सध्याच्या परिसअथितीत देशांतर्गत बाजारपेठेचे हित जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे आर्थिक विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

युरेशियन आर्थिक संघ अथवा EAEU चे अन्य सदस्य राज्यांमध्ये आर्मेनिया, बेलारूस, कझाकिस्तान आणि किर्गीस्तान यांचा समावेश आहे. ते रशियाकडून गहू, मक्का व इतर धान्याची आयात करण्यापासून वंचित राहणार आहेत. मॉस्कोमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की, रशियाकडे सध्या आपल्या गरजेपेक्षा अधिक धान्याचा साठा आहे. मात्र, इतर देशांना त्याची निर्यात करण्यावर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रशियाच्या आर्थिक विकास मंत्रालयाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ईएईयू देशांनी सध्याच्या हंगमात आपल्या गरजेइतके करमुक्त धान्य आधीच आयात केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here