आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम, ३१ ऑगस्टपर्यंत निर्बंध

नवी दिल्ली : नागरी उड्डाण महासंचालनालाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणावरील निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत वाढविले आहेत. यापूर्वी हे निर्बंध ३१ जुलैपर्यंत होते. त्याची मुदत शनिवारी संपणार होती. त्यामुळे डीजीसीएने यामध्ये एक महिन्याची वाढ केली आहे.

मात्र काही निवडक मार्गावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी मिळू शकते असे डीजीसीएच्या नव्या अध्यादेशात म्हटले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय कार्गो फ्लाइटसवर हे निर्बंध लागू नाहीत. गेल्या वर्षी पहिल्यांदा कोरोना महामारीनंतर आंतरराष्ट्रीय विमान प्रवास खंडित करण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी या निर्बंधात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात काही अटींवर सेवा सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. गेल्या वर्षी परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत मिशन राबवले होते. याशिवाय काही देशांशी एअर बबल समझोता करण्यात आला आहे.

दरम्यान आता वाढवण्यात आलेले निर्बंध ही कोरोनाच्या नव्या लाटेची चाहूल असल्याचे बोलले जात आहे. केरळने याआधीच विकेंड लॉकडाउन जाहीर केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here