बांगलादेशमध्ये साखर उत्पादन वाढविण्याचे लक्ष्य

जयपूरहाट. बांगलादेश : देशातील सर्वात मोठी साखर उत्पादक कंपनी जॉयपुरहाट साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चालू गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये ६,००० एकर जमिनीत ऊस लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्याच्या हंगामातील ऊस लागवड एक सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ऊस शेतीसाठी प्रोत्साहित करीत आहेत. जर ऊस लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले तर ३३,००० टन ऊस उत्पादन होण्याची शक्यता आहे. ६,००० एकर जमिनीत २,११८ टन साखर उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

जॉयपुरहाट साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अखलासुर रहमान यांनी सांगितले की, सद्यस्थितीत ऊसाचा कारखाना गेटवरील दर ४,४५० टका प्रती टन तर बाहेरील खरेदी दर ४,४४० टका प्रती टन निश्चित करण्यात आला आहे. ऊस शेतीसाठी २,७०० शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारी मदतीच्या रुपात १,९०,००,००० टका कर्जाची सुविधा देण्यात आली आहे. अखलासुर रहमान यांनी सांगितले की, उसाची तोडणी डिसेबर २०२२ च्या अखेरच्या आठवड्यात होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here