बांगलादेश: आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीनंतरही देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात तेजी

चट्टोग्राम : शहरातील होलसेल बाजारामध्ये जीवनावश्यक वस्तुंच्या दरातील तेजी कायम आहे. यामध्ये बंदरावरील शहर खातूनगंज घाऊक हबमध्ये साखरेच्या दरात प्रती mound (सुमारे ३७ किलो) Tk130 पर्यंत वाढली आहे. अलिकडेच आंतरराष्ट्रीय बाजारात आवश्यक वस्तूंच्या बुकिंग दरात घसरण आली असतानाही आयातदारांनी दरवाढ केल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. खातूनगंज घाऊक बाजारात गेल्या महिन्याच्या तुलनेत साखर जादा दराने मिळत आहे. आता साखर Tk2,630 प्रती mound ला मिळते. गेल्या महिन्यात हा दर Tk2,530 असा होता. साखरेचा दर गेल्या महिन्यात Tk130 पर्यंत वाढला आहे. साखरेच्या प्रकारानुसार एस आलम Tk2,630 प्रती mound, मेघना ग्रुपचा फ्रेश ब्रँड Tk2,630 आणि सिटीग्रुपची इग्लू ब्रँड साखर Tk2,625 अशा दराने विक्री केली जात आहे.

खातून गंजच्या घाऊक साखर व्यापाऱ्यांनी सांगितले की, खातून गंजसह स्थानिक बाजारांमध्ये साखरेचे दर गेल्या सहा महिन्यांपासून वाढत आहेत. ते म्हणाले, गेल्या एका महिन्यात जागतिक बाजारात झालेल्या घसरणीनंतरही स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दरात तेजी दिसत आहे. खातून गंज येथील एक घाऊक व्यापारी मेसर्स इस्माइल ट्रेडर्सचे मालक अब्दुर रज्जाक यांनी सांगितले की, मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा असूनही आयातदार साखरेच्या किमती निंयंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते सिंडिकेट करण्याचा प्रयत्न करताहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचा दर Tk200 प्रती mound घसरला आहे. घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले की, थंडीच्या हंगामात साखरेची मागणी नेहमीच निम्म्यावर येते. मात्र, खासगी कंपन्या आता आपल्या मर्जीने साखरेच्या बाजारावर नियंत्रण ठेवू पाहत आहेत. सरकारी कंपन्यांचा पुरवठा घटल्याने ही स्थिती आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here