ढाका : सरकारी खरेदीसंबंधी मंत्रिमंडळाच्या समितीने ईद-उल-अजहापूर्वी एक कोटी कुटूंबांना सवलतीच्या दरात साखरेसह डाळ, तेल अशा जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी १.९२ करोड़ लीटर सोयाबीन तेल, १५,००० टन साखर आणि १३,५०० टन मसूर खरेदीसाठी विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. २२ जून ते ५ जुलै यांदरम्यान लोकांमध्ये या वस्तूंचे वितरण केले जाणार आहे. बैठकीत १.३० लाख टन खते खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विभागाचे अतिरिक्त सचिव एमडी जिल्लूर रहमान चौधरी यांनी सांगितले की, राज्यस्तरीय करार अस्तित्वात असल्याने सरकार या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांच्या तुलनेत कमी दरात खरेदी करू शकते. वाणिज्य मंत्रालयाच्या अन्य एका प्रस्तावानुसार, Trading Corporation of Bangladesh (TCB) मेघना शुगर रिफायनरी लिमिटेड आणि सिटी शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडकडून जवळपास Tk123.05 crore रुपयांमध्ये जवळपास १५,००० टन साखर खरेदी करेल. या प्रस्तावानुसार, प्रत्येक किलोग्रॅम पॅकेज्ड साखरेची किंमत Tk84 हून थोडी अधिक असेल. तर ५० किलोग्रॅमच्या पोत्याची किंमत प्रती किलो Tk81 पेक्षा थोडी जास्त असेल.