बांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने स्पेअरपार्ट्स पुरवठादार कंपनीचे मोठे नुकसान

ढाका : बांगलादेशातील सहा साखर कारखाने बंद झाल्याने साखर कारखान्यांना स्पेअर पार्टस् पुरवठादार रेनविक जाजनेस्वर अँड कंपनीला (बीडी) मोठे नुकसान सोसावे लागत आहे. कारखाने बंद झाल्याने पार्ट्सच्या विक्रीत गतीने घसरण झाली आहे. सरकारने कोविड १९ महामारीदरम्यान २०२० मध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरणासाठी सहा कारखाने बंद करण्याचा निर्णयघेतला. त्यामुळे या कारखान्यांना रेनविक जाजनेश्वर कंपनीला आपल्याकडील उत्पादनांचा पुरवठा करता आलेला नाही. त्यामुळे कंपनीच्या महसुलात घसरण झाली आहे. रेनविक जाजनेश्वरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १८८१ मध्ये कुश्तीयामध्ये ३८.९८ एकर क्षेत्रात स्थापन झालेली ही कंपनी सुरुवातीला फायद्यात होती. मात्र, आता कर्जे आणि अधिक खर्चांमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

त्यांनी सांगितले की, कंपनी साखर कारखान्यांना पार्ट्स पुरवठा करते. कारखान्यांची देखभाल आणि दुरुस्ती यातून कंपनी दरवर्षी सुमारे १५ कोटी रुपये मिळवते. आता सहा कारखाने बंद झाल्याने उत्पन्नात मोठी घसरण झाली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये Tk १३ कोटी रुपयांची कमाईकेली. मात्र, आगामी आर्थिक वर्षात कंपनी Tk 6 कोटी रुपये कमावेल अशी शक्यता आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक अल-वदूद अमीन यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षापर्यंत आम्ही नफ्यात होतो. मात्र, सद्यस्थितीत सरकारकडून बिले मिळण्यास होणारा उशीर आणि आर्थिक संकटामउळे आम्ही ३ कोटी रुपये तोट्यात आहोत. सहा कारखाने बंद झाल्याने आमची कमाई घटली आहे. आमचा व्यवसाय आता फक्त नऊ कारखान्यांवर अवलंबून आहे. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याचे अमीन यांनी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here