बांगलादेश : साखर कारखान्यांकडून कमी साखर उत्पादनाची शक्यता

ढाका : ठाकुरगंज आणि जॉयपुरहाट साखर कारखान्यांमध्ये यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले आहे. ऊसाच्या गाळप क्षमतेत या कारखान्यांनी कपात केली आहे. ठाकूरगंज साखर कारखान्याने २४ डिसेंबर रोजी ऊस गाळप सुरू केले आहे. तर जॉयपुरहाट साखर कारखान्याने ३० डिसेंबर रोजी गाळप सुरू केले.

सुरुवातीच्या तांत्रिक बिघाडांमुळे ठाकुरगंज साखर कारखान्याच्या गाळपामध्ये अडथळे निर्माण झाले. दुरुस्ती केल्यानंतर कारखान्याने गाळप सुरू केले आहे. कारखान्याची यंत्रसामुग्री जुनी झाल्यामुळे तांत्रिक अडचणी येणे ही नियमित बाब असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ढाका येथील तज्ज्ञांनी दुरुस्ती केल्यानंतर कारखाना पुन्हा सुरू झाला. कारखाना प्रशासनाने ५०,००० टनाहून अधिक गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. ३६ हजार टन ऊस जिल्ह्यातून येईल. तर दिनाजपूर आणि पंचगड येथून उर्वरीत ऊस येईल. ठाकुरगंज कारखान्याचे महा व्यवस्थापक अबू रेहान यांनी सांगितले की गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा उतारा चांगला आहे. हंगामात ३७५० टन साखर उत्पादन झाले आहे.

जॉयपुरहाट साखर कारखाना किमान ३०,००० टन ऊस गाळप करेल. गेल्यावर्षी १.६ लाख टन गाळप झाले होते. यावर्षी जवळपास १८०० टन साखर उत्पादन होईल. साखर उतारा ६.५ टक्के राहील. जॉयपुरहाट साखर कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक रब्बिक हसन म्हणाले की, कारखाना केवळ जिल्ह्यातील ऊसाचे गाळप करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here