बांगलादेश: सरकारी कारखान्यांतील साखर उत्पादन २३ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर

ढाका : ऊस उपलब्धतेतील तुटवड्यामुळे बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्री कॉर्पोरेशन (बीएसएफआयसी) च्या कारखान्यांमधील साखर उत्पादन २३ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. राज्याद्वारे संचलित कारखान्यांनी चालू आर्थिक वर्ष (FY) मध्ये आतापर्यंत २१,३१३ टन साखर उत्पादन केले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील २४,५०९ टनापेक्षा ते १३ टक्क्यांनी कमी आहे. बीएसएफआयसीने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ४८,००० टन साखर उत्पादन केले होते.

बांगलादेश आर्थिक आढावा २०२२ अनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कॉर्पोरेशनला अद्याप ८८० कोटी टका तोटा झाला आहे. मात्र, गेल्या वर्षी नोंदणीकृत १,०३६ कोटी टकापेक्षा हा तोटा १५ टक्क्यांनी कमी आहे. बीएसएफआयसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारखान्याच्या आसपासच्या क्षेत्रातील उसाची लागवड दीर्घ काळापासून घटली आहे आणि चालू आर्थिक वर्षात ती ५०,००० एकरापर्यंत पोहोचली आहे. शेतकरी उसाऐवजी मक्का उत्पादन करीत आहेत. त्याचे उत्पादन घेणे सोपे आणि अधिक फायदेशीर आहे.

बीएसएफआयसीचे अध्यक्ष एमडी अरिफुर रहमान अपू यांनी सांगितले की, त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांकडून पुरेसा ऊस मिळत नाीही. साखरेचे उत्पादन अशावेळी कमी झाले आहे, जेव्हा त्याच्या किमती १४० टका प्रती किलोच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशकडील आकडेवारीनुसार, असे दिसून येते की, गेल्या एक वर्षात ढाक्यामध्ये साखरेच्या किरकोळ किमती ६६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सद्यस्थितीत BSFIC कडे ९,६३३ टन साखर आहे. एकूण साठ्यापैकी फक्त १,३०० टन जूनपर्यंत जनतेला जारी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

बीएसएफआयसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते डिलर्सना खुली साखर १०० टका प्रती किलो दराने उपलब्ध करून देतात. तर पॅकिंग साखर १०५ टका प्रती किलो दराने दिली जाते. कॉर्पोरेशन देशभरात सक्रीय २,५०० डिलर्सच्या माध्यमातून साखरेचे वितरण करते. त्यामध्ये प्रत्येक डिलरला वर्षाला फक्त ५०० किलो साखर मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here