बांगलादेश: साखर कारखाने बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल

ढाका : देशभरात तोट्यामध्ये सुरू असलेल्या पबना शुगर मिल, सेताबगंज शुगर मिल्स, कुश्तिया शुगर मिल्स, पंचगर शुगर मिल्स लिमिटेड, श्यामपुर शुगर मिल आणि रंगपूर शुगर मिल्सला बंद करण्यात आले आहे. हे सहा साखर कारखाने बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा थेट परिणाम ऊसाचे लागवड क्षेत्र घटण्यावर झाला आहे. ऊस उत्पादक शेतकरी आता भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. देशातील हजारो शेतकऱ्यांनी साखर कारखाने बंद झाल्यानंतर ऊस विक्रीत आलेल्या अडचणी लक्षात घेऊन यावर्षी भाजीपाला उत्पादनाकडे लक्ष दिले आहे. मात्र, शेतकरी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे ऊस पिक घेता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत आहेत.

ऊस उत्पादनातून इतर कोणत्याही पिकांच्या तुलनेत अधिक फायदा मिळतो असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उसाच्या दरात कधीही घसरण होत नाही असा शेतकऱ्यांचा दावा आहे. भाजीपाला उत्पादन करणे तुलनात्मकदृष्ट्या फायदेशीर नाही. देशात आता उसाची शेती हळूहळू कमी होत आहे. त्याचा थेट परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. शेतकऱ्यांना एक एकर उसातून साधारणतः ४०,००० ते ५०,००० रुपयांची कमाई होते. तर साखर कारखान्यांकडूनही उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना रोख मदत, बियाणे, खते, कीटकनाशके पुरविली जात जातात.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या (बीएसएफआयसी) म्हणण्यानुसार, २०२१-२२ या हंगामात सहा सरकारी साखर कारखाने बंद झाल्यानंतर ऊस शेतीमध्ये प्रचंड घट झाली आहे. बीएसएफआयसीच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, २०२०-२१ या गळीत हंगामात १६.४३ लाख टन ऊस उत्पादनासाठी १.२७ लाख एकर जमिनीवर ऊस शेती केली गेली. चालू आर्थिक वर्षात १५ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ४९,९०८ एकर ऊस शेतीअंतर्गत घेण्यात आला. त्यातून अंदाजे ६.५७ लाख टन उत्पादन आहे. देशाच्या मालकीचे सहा कारखाने बंद करण्यात आल्याने यंदा ऊस उत्पादनात मोठी घट आल्याचे अहवालात म्हटले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here