बँक कर्मचारी २२ ऑक्टोबरला संपावर

171

कोलकाता : ऐन दिवाळीच्या तोंडावरच सरकारी बँकांच्या दोन संघटनांनी २२ ऑक्टोबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) व बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या बँक कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा व मुदत ठेवींवरील घटत्या व्याजदराचा निषेध करण्यासाठी संप पुकारण्यात आल्याचे संघटनांतर्फे सांगण्यात आले. असे असले तरी उर्वरित ७ संघटनांचा या संपाला पाठिंबा नाही. त्यामुळे बँकांच्या कामकाजावर या संपाचा फार परिणाम होणार नाही, अशी शक्यता आहे.

संपापासून दूर असलेल्या सात कर्मचारी संघटनांमध्ये तीन संघटना या कर्मचाऱ्यांच्या तर, चार संघटना अधिकाऱ्यांच्या आहेत. एआयबीईए आणि बीईएफआय या संघटनांमध्ये आमच्या बँकेचे फार नसल्याने या संपाचा आमच्या बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, असे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

या संपामुळे ग्राहक सेवेवर परिणाम होवू शकतो. त्यामुळे या संपादरम्यान बँकेचे कामकाज सुरळीत राहण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात येतील असे बँक ऑफ महाराष्ट्र आणि सिंडीकेट बँकेतर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने संपाची हाक दिली होती. पण सरकारच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here