बँक ऑफ बडोदा ईएसपी योजनेंतर्गत 1,132 कोटी रुपये जमा करेल

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा कर्मचारी शेअर खरेदी योजना (ईएसपीएस) अंतर्गत कर्मचार्‍यांना नवीन शेअर्स लागू करुन 1,132.05 कोटी रुपये जमा करेल, असे बँकेने सांगितले. मंगळवारी झालेल्या बैठकीत मंडळाच्या कॉम्पेनसेशन कमिटीने हा निर्णय घेतल्याचे, बँकेने नियामक फाईलिंगमध्ये म्हटले आहे.

या बैठकीमध्ये, मंडळाच्या कॉम्पेनसेशन कमिटीने विचार करुन, बँकेच्या सर्व पात्र कर्मचार्‍यांना 20 टक्के सवलतीत 15 करोड पर्यंत नवीन इक्विटी शेअर्स जारी करण्यासाठी, बँक ऑफ बडोदा ईएसपीएस – 2019 या प्रस्तावास मान्यता दिली आहे. प्रस्तावित इश्यू प्राईस प्रति शेअर 75.47 रुपये आहे, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
बीएसई वर बँकांचे शेअसं 1.24 टकक्यांनी घसरुन 91.45 रुपयांवर बंद झाले आहे.

यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here