सरकारी बँक कर्मचारी 8 जानेवारीला संपावर

सोलापूर : राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी 8 जानेवारीला देशव्यापी संप केला जाणार आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार कर्मचारी सहभागी होतील, अशी माहिती सरकारी- निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीचे राज्य संघटक व निमंत्रक शंकर जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बुधवारी (ता. 8) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी आपल्या सदस्य कर्मचाऱ्यांना ८ जानेवारी रोजी बँक कामकाजात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

नेटबँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस आदी ऑनलाइन सुविधांना मात्र फरक जाणवणार आहे. अर्थात, बँक शाखांमधील पैसे काढण्याची सुविधा कोलमडल्यास एटीएमवर ताण येईल. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनीही अधिकाऱ्यांना आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत अधिकाऱ्यांनी कोणतेही काम करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. बँकिंग सुधारणा, बँकांचे विलीनीकरण याचा निषेध म्हणून हा संप करण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीच्या प्रमुख मागणीचाही यात समावेश आहे.

अशा आहेत मागण्या :
* वेतनवाढीच्या प्रलंबित मागणीकडे सरकारकडून ,दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
* एप्रिल २०१० नंतर रूजू झालेल्या बँक कर्मचाऱ्यांनादेखील पेन्शनसंबंधी सर्व लाभ देणे
* पाच दिवसांचा आठवडा
* अपुऱ्या कर्मचारीसंख्येमुळे पडणारा कामाचा प्रचंड ताण पाहता नोकरभरतीची गरज

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here