शेतकर्‍यांसाठी अमरपूर मध्ये सुरु होणार साखर कारखाना

बांका(बिहार) : जदयू नेता पुष्पम सिंह यांनी सांगितले की, बिहार सरकार सामान्य जनतेसह शेतकर्‍यांच्या हितासाठी कार्यरत आहे. त्यांनी सांगितले की, सरकार प्रवासी मजूरांना त्यांच्या जिल्ह्यातरोजगार देण्याच्या दृष्टीने अग्रेसर आहे. अमरपूर मध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना पुन्हा सुरु केला जाणार आहे. जेणेकरुन, बाहेरुन आलेल्या प्रवासी मजूरांना त्यांच्या राज्यातच रोजगार मिळू शकेंल. रविवारी जदयू नेता यांनी हे सांगितले. ते म्हणाले, अमरपूर च्या प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतापर्यंत विज पोचवण्यासाठी सरकार काम करत आहे. यापूर्वी त्यांनी अमरपूर विधान सभा येथील डझनभर गावांचा दौरा करुन जनतेशी संपर्क़ साधला. यावेळी गावप्रमुख सूर्यदेव सिंह, रविरंजन तोमर, संतोष कुमार सिंह, रिकू सिंह, निर्मल सिंह, विभाष सिंह, राजकुमार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here