मार्चमध्ये बँकांचा संप, बँका सलग 5 दिवस बंद

141

नवी दिल्ली : बँक कर्मचार्‍यांचे वेतन वाढवण्याच्या मागणी संदर्भात इंडिया बँक असोसिएशन सोबत झालेल्या चर्चेतून कोणताही तोडगा न निघाल्यामुळे लागोपाठ 5 दिवस बँक कर्मचारी संपावर जाऊ शकतात. तसेच या संपाची मार्च महिन्याच्या दुसर्‍या शनिवारच्या आधी घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे 11, 12 आणि 13 मार्च असे तीन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. तर याला जोडून दुसरा शनिवार आणि रविवार आल्यामुळे सलग 5 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच जरी बँकांचा संप असला तरी या संपामुळे आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकांच्या कामकाजावर कोणताच परिणाम होणार नसल्याचीही माहिती दिली आहे.

सरकारी बँक कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा संपाचा इशारा दिला आहे. बँक कर्मचार्‍यांच्या पगारात 2012मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वर्ष 2017 पर्यंत त्यांच्या पगारात कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे दर 5 वर्षांनी त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, वेतन वाढीच्या प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वीही बँक कर्मचार्‍यांनी संप केला होता. त्यावेळी 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला सरकारी बँकांनी संप पुकारला होता. तसेच जोडून रविवार आल्यामुळे एकूण तीन दिवस बँका बंद होत्या. परंतु या संपाला केंद्र सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा बँक कर्मचार्‍यांनी संप करण्यार असल्याची माहिती दिली आहे. 8 जानेवारी रोजी सराकारच्या धोरणांना विरोध करत कर्मचारी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं. तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर एक एप्रिलपासून अनिश्‍चित काळासाठी संप पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here