बँका बंद : २८ दिवसांच्या फेब्रुवारीत १२ दिवस बँकांना असणार सुट्टी

जर तुमचे बँकिंग क्षेत्राशी संबंधीत काही काम असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी २०२२ मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार या महिन्यात जवळपास १२ दिवस बँका बंद राहतील. आरबीआयच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, राज्यनिहाय या सुट्ट्या वेगवेगळ्या आहेत. या सुट्या सर्व राज्यांत लागू नसतील. रविवारशिवाय महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतील. मात्र, ऑनलाइन कामकाज सुरू राहील.

या महिन्यात २ फेब्रुवारी रोजी सिक्कीममध्ये बँका बंद राहील्या. ५ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमची सुट्टी असेल. आगरताळा, भुवनेश्वर आणि कोलकातामध्येही बँका बंद राहतील. १२ फेब्रुवारी रोजी दुसरा शनिवारमुळे बँका बंद असतील.

१६ फेब्रुवारी रोजी गुरु रविदास जयंती, १८ फेब्रुवारी रोजी डोलजत्रा, १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमुळे महाराष्ट्रात बँका बंद राहतील. याशिवाय रविवारमुळे ६,१३,२० आणि २७ फेब्रुवारी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या निवारमुळे १२ आणि २६ फेब्रुवारीला बँका बंद असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here