नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. या बरोबरच बॅंकिंग क्षेत्रातील राष्ट्रीय तसेच राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुट्ट्यांची यादी उपलब्ध झाली आहे. केंद्र सरकारकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) अशा तीन राष्ट्रीय सुट्टी दिल्या जातात.
आता शनिवारपासून नव वर्ष सुरू झाले आहे. जानेवारी महिन्यात सोळा दिवस बॅंका बंद राहणार आहेत. यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार, चार रविवार आदींचा समावेश आहे. याशिवाय मकर संक्रांत, स्वामी विवेकानंद जयंती, प्रजासत्ताक दिन व इतर सुट्यांचा समावेश आहे. देशभरात सर्व ठिकाणी सोळा दिवस सुट्टी नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी सुट्टी दिली जाते. फेब्रुवारी महिन्यात वसंत पंचमीची सुट्टी असेल.
तर मार्च महिन्यात महाशिवरात्र तसेच होळीची सुट्टी असेल. एप्रिलमध्ये रामनवमी, तेलगू नववर्ष, बाबासाहेब आंबेडकर जयंती, तमीळ नववर्ष, गुड फ्रायडे, बंगालचे नववर्ष, हिमाचल डे आदींच्या सुट्ट्या असतील. मे महिन्यात कामगार दिन, अक्षय तृतीया, बुद्ध पोर्णिमेची सुट्टी असेल.
जुलैमध्ये बकरी ईद, ऑगस्टमध्ये मोहरम, पारसी न्यू इअर, जन्माष्टमी आदींचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये थिरुमाना तर ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधी जयंती, महाअष्टमी, ईद ए मिलाद, दिवाळीच्या सुट्ट्या मिळतील. नोव्हेंबरमध्ये नानक जयंती तर डिसेंबरमध्ये ख्रिसमसची सुट्टी बँकांना असेल. यातील काही सुट्ट्या त्या-त्या राज्यनिहाय असतील.