बांगलादेशमध्ये साखर आयातीसाठी बँकांना पुरेसे डॉलर उपलब्ध करून देण्याची गरज : पंतप्रधान शेख हसिना

ढाका : ऊर्जा आणि खनिज संसाधन विभागाने तरल नैसर्गिक गॅसची (एलएनजी) आयात करणाऱ्या उद्योगांना गॅसचा पुरवठा नियमित करावा असे निर्देश बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांनी दिले आहेत. एका बैठकीत त्यांनी सांगितले की, बांगलादेश बँकांना खासगी क्षेत्रातील अन्न आणि गहू, साखर, तेल अशा विविध ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी letters of credit (LCs) उघडण्यासाठी बँकांना पुरेसे डॉलर उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

देशाची सर्वंकष आर्थिक स्थिती आणि इतर प्रासंगिक मुद्यांचा आढावा घेताना पंतप्रधान हसीना यांनी स्पष्ट केले ही कृषी आणि अन्नधान्यावरील सबसिडी सुरू राहील. पंतप्रधान म्हणाल्या की, उद्योग आपली उत्पादने सुरू ठेवण्यासाठी गॅससाठी अधिक पैसे देण्यास तयार असतात. त्यामुळे जादा दरानेही गॅसची आयात केली जाईल आणि उद्योगांना प्रीमियमवर त्याचा पुरवठा केला जाईल. त्यांनी National Board of Revenue (NBR) च्या अध्यक्षांना कार, फळांसह लक्झरी सामानावर अतिरिक्त शुल्क आकारणीचेही निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here