बँकांचा आज, उद्या संप, १० लाख कर्मचाऱ्यांचा सहभाग

नवी दिल्ली : दोन बँकांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात सोमवारी आणि मंगळवारी देशभरातील बँक कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. संपामुळे पैसे काढणे, जमा करणे, चेक क्लिअरन्स आणि कर्ज मंजुरीसारख्या बँकिंग कामकाजावर परिणाम होणार आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखाली नऊ संघटनांनी संपाचे आवाहन केले होते. ऑफ इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी १० लाख बँक कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.

भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँकेसह अनेक सरकारी बँकांनी आधीच आपल्या ग्राहकांना संपामुळे कामकाज बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे. दर्यान, संपादिवशी बँका, शाखांमध्ये इतर आवष्यक पद्धतीने कामकाजासाठी प्रयत्न केले गेले आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सरकार यावर्षी दोन बँका आणि एका विमा कंपनीच्या खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली होती. सरकारने यापूर्वी आयडीबीआयमधील आपल्या हिश्श्याची विक्री भारतीय जीवन विमा निगमला केली आहे. गेल्या चार वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील १४ बँकांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.
वेंकटचलम यांनी सांगितले की, ४, ९ आणि १० मार्च रोजी मुख्य कामगार आयुक्तांशी झालेल्या बैठकीतून कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे १५ आणि १६ मार्च रोजी दोन दिवसांच्या संपाची घोषणा करण्यात आली. दहा लाख कर्मचारी, अधिकारी यात सहभागी होतील. युनायटेड फ्रंट अँड बँक युनियन्समध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉइज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) सहभागी आहेते.

दरम्यान यांदरम्यान एटीएम सुरू राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर १७ आणि १८ मार्च रोजी सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या युनीयन्स संप करणार आहेत. एलआयसीच्या सर्व युनीयन्स १८ मार्च रोजी काम बंद आंदोलन करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here