डिसेंबरमध्ये ११ दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

वर्षाच्या अखेरच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये देशाच्या विविध भागात बँका एकूण ११ दिवस बंद राहणार आहेत. मात्र या कालावधीत ऑनलाइन बँकिंगचे कामकाज सुरू राहणार आहे. बँकांतील प्रत्यक्ष व्यवहार बंद राहणार असल्याने त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना अडचण येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या डिसेंबर महिन्यातील बँकांची सुट्ट्यांची यादी.
डिसेंबरमधील पहिली सुट्टी, ३ डिसेंबर रोजी शुक्रवारी असेल. या दिवशी सेंट फ्रान्सिस झेव्हियर्सच्या जयंतीनिमित्त पणजीत बँका बंद राहतील. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल. अशाच प्रकारे ११ आणि १२ डिसेंबर रोजी अनुक्रमे दुसरा शनिवार व रविवारी बँका बंद राहतील. हे साप्ताहिक सुट्टीचे दिवस आहेत.

तर १८ डिसेंबर रोजी शिलाँगमध्ये बँकांचा कामकाज बंद असेल. येथे यू सोसोय थाम यांची पुण्यतिथी असेल. तर १९ डिसेंबर रोजी रविवार आहे. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी आयजोल आणि शिलाँगमध्ये बँका राहतील. तर २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसमुळे बहुतांश राज्यात बँकांना सुट्टी असेल. याशिवाय २६ डिसेंबर रोजी रविवार आहे. त्यामुळे २५ आणि २६ डिसेंबर अशी दोन दिवसांची सुट्टी बँकांना मिळेल. तर शिलाँग आणि आयझॉलमध्ये ३० व ३१ डिसेंबर रोजी बँकांचे कामकाज ठप्प राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here