सप्टेंबर महिन्यात १२ दिवस बंद राहाणार बँका, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

सप्टेंबर महिना सुरू होण्यास काही दिवसच शिल्लक राहीले आहेत. या नव्या महिन्यात बँकिंगशी संबंधित कामे करु इच्छित असाल तर पहिल्यांदा बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासा. त्यानंतर तुम्ही आपले कामाचे प्लॅनिंग करू शकता. सप्टेंबर महिन्यात जवळपास बारा दिवस बँकांचे कामकाज बंद राहाणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार ८,९,१०,११,१७,२० आणि २१ सप्टेंबर रोजी देशातील विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ८ सप्टेंबर रोजी श्रीमंत शंकरदेव तिथी आहे. तर ९ सप्टेंबर रोजी हरितालिका सण आहे. १० आणि ११ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीमुळे विविध राज्यांत बँका बंद राहतील. १७ सप्टेंबर रोजी कर्मा पूजन, २० सप्टेंबर रोजी इंद्रजात्रा, २१ सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरू समाधी दिवसामुळे काही राज्यांत बँकांचे कामकाज बंद राहील. याशिवाय ५, १२, १९, २६ सप्टेंबर रोजी रविवार आहे. हे साप्ताहिक सुट्टीचे दिवस आहेत. याशिवाय २५ सप्टेंबरला चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील.

या महिन्यातील सुट्ट्यांची यादी तपासली तर एकूण १२ दिवस कामकाज बंद राहिल. या सुट्ट्या सणांच्या आधारावर आहेत. सर्व राज्यांमध्ये त्या लागू नाहीत. बँका ज्या राज्यांत आहेत, तेथील मंजुरी, सणाच्या आधारावर सुट्टी मिळेल. मात्र, यादरम्यान ऑनलाईन कामकाज सुरू राहील. डिजिटल बँकिंगमध्ये ग्राहकांना अडचणी येणार नाही.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here