जून महिन्यात बँका नऊ दिवस राहाणार बंद, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

73

नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीच्या फैलावामुळे, भीषण बनलेल्या दुसऱ्या लाटेमुळे बँकांचे कामकाजही विस्कळीत झाले आहे. अनेक बँकांनी आपल्या सुरू आणि बंद करण्याच्या वेळांत बदल केला आहे. याशिवाय, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा सुविधांचा वापर करण्यास सांगितले जात आहे. मात्र, जर तुम्हाला कामानिमित्त बँकांमध्ये जावेच लागणार असेल तर जाणून घ्या, जून महिन्यात बँकांचे किती दिवस कामकाज चालणार आहे आणि किती दिवस बँका बंद राहातील.

अन्य महिन्यांप्रमाणे जून मध्ये कोणताही मोठा सण, उत्सव नाही. तरीही बँका नऊ दिवस बंद राहातील. यातील बहुतांश साप्ताहिक सुट्ट्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या निर्देशानुसार, १५ जून रोजी भूवनेश्वर (ओरिसा) आणि एजवल (मिझोराम) मध्ये मिथून संक्रांत, रज पर्वामुळे बँका बंद राहातील. याशिवाय, देशाच्या इतर भागात बँका सुरू राहतील.

जून महिन्यात ६, १२ आणि १३ जून हे साप्ताहिक सुट्टीचे दिवस आहेत. १५ जून रोजी एजवल (मिझोराम) आणि भुवनेश्वर (ओडिसा) मध्ये मकर संक्रांत, रज पर्वाची सुट्टी असेल. उर्वरीत देशातील बँका सुरू राहतील. २० जून रोजी साप्ताहिक सुट्टी आहे. २५ जून रोजी जम्मू-श्रीनगरमध्ये गुरु गोविन्द सिंह जन्म जयंतीमुळे बँका बंद राहतील. तर २६, २७ जून रोजी साप्ताहिक सुट्टी असेल. 30 जून रोजी रेमानाची सुट्टी मिझोराममध्ये असेल. उर्वरीत देशात कामकाज सुरू राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here