२७ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान फक्त ४ दिवस सुरू राहणार बँका

129

नवी दिल्ली : चालू आठवड्यात देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका २७ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत फक्त चार दिवस सुरू राहणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, बँका २७ मार्च – चौथा शनिवार, २८ मार्च रोजी रविवार आणि २९ मार्च रोजी होळीच्या सणानिमित्त बंद राहतील. होळीनंतर ३० आणि ३१ मार्च रोजी बँका सुरू राहणार आहेत. मात्र १ एप्रिल रोजी बँका वार्षिक समायोजन करण्यासाठी फक्त कार्यालयीन कामकाज करतील.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँका २ एप्रिल रोजी गुड फ्रायडेनिमित्त बंद असतील. तर ४ एप्रिल रोजी रविवार आहे. तीन एप्रिल रोजी बँकांचे कामकाज सुरू राहील.

बँकांनी ग्राहकांचे नुकसान होऊ नये यासाठी पुरेशी तयारी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कालावधीत सर्व बँकांची एटीएम सुविधा तसेच इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here