एक एप्रिल २०२२ पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. २०२२-२३ हे आर्थिक वर्ष अनेकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. यासोबत अनेक गोष्टी बदलणार आहेत. यात बँकिंगचाही समावेश आहे. मात्र, बँकिंगशी जोडलेले काही काम असेल तर ते लवकर पूर्ण करावे लागेल. कारण आर्थिक वर्षात विविध ठिकाणी ३० पैकी १५ दिवस बँकांशी संबंधीत कामे होणार नाहीत. आरबीआयने बँकांच्या सुट्ट्यांची यादी वेबसाइटवर अपलोड केली आहे. त्यानुसार विविध भागात बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुढी पाडवा, सरहूल अशा प्रसंगी बँका बंद राहतील. विविध झोनमध्ये बँका १५ दिवस बंद राहतील. यात चार रविवार, आणि दुसरा तसेच चौथा शनिवार समाविष्ट आहे.
याशिवाय एक एप्रिलला आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ग्राहकांसाठी कामकाज झालेले नाही. २ एप्रिल रोजी शनिवारी गुढी पाडव्याची सुट्टी आहे. यात उगाडी फेस्टिव्हल, नवरात्रीचा पहिला दिवस, तेलगू नववर्ष, चैरोबानिमित्त बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगर झोनमध्ये सुट्टी असेल. ४ एप्रिल रोजी सरहुल आहे, तर ५ एप्रिलला बाबू जगजीवन राम यांची जयंती आहे. रांची झोनमध्ये ही सुट्टी असेल. १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती, १५ एप्रिल रोजी गुड फ्रायडे, १६ एप्रिलला बोहाग बिहुमुळे गुवाहटीत बँका बंद राहतील. २१ एप्रिल रोजी आगरतळा झोनमध्ये गडिया पूजन सण आहे. २९ एप्रिल रोजी शब ई कद्र, जुमात उल विदा यामुळे जम्मू-श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.