जूनमध्ये तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : जून महिन्यात आपली बँकेत काही महत्वाचे काम असेल तर मग ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने जून 2023 मधील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जूनमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. जून महिन्यात महत्त्वाच्या कामासाठी बँकेच्या शाखेत जाण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाणून घेऊयात

बँकांना जून महिन्यात एकूण 12 दिवस सुट्टी असेल. यातील अनेक सुट्ट्या सलग येतील. पण या सुट्ट्या देशातील सर्व राज्यांमध्ये सारख्या नाहीत.  RBI च्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार वेगळ्या आहेत. तसेच आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त, बँका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतील.

जूनमध्ये या दिवशी बँका राहतील बंद

04 जून 2023 –   रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

10 जून 2023-   महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी असेल.

11 जून 2023-   रविवार असल्याने सुट्टी असेल.

15 जून 2023 –  राजा संक्रांती आहे, त्यामुळे मिझोराम आणि ओडिशामध्ये बँका बंद राहतील.

18 जून 2023-  रविवार असल्याने सुट्टी असेल.

20 जून 2023 – या दिवशी रथयात्रा असल्याने ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.

24 जून 2023-  हा दिवस जूनचा शेवटचा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

25 जून 2023-  रविवार बँकेला सुट्टी असेल.

26 जून 2023-   या दिवशी फक्त त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.

28 जून 2023- ईद-उल-अजहा निमित्त महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.

29 जून 2023-  ईद-उल-अजहानिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

30 जून 2023-  बँका मिझोराम आणि ओडिशामध्ये बंद राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here