चार एकर ऊस आगीमध्ये भस्मसात, शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

पीलीभीत(उत्तरप्रदेश) : थाना सेहरामउ उत्तरी क्षेत्रातील गावात पिंपरा मुजप्ता मध्ये बुधवारी दुपारी अचानक ऊसाच्या शेतात आग लागली. यामुळे 6 शेतकर्‍यांचा चार एकर शेतातील ऊस आगीत जळून खाक झाला. योग्य वेळी पोचलेल्या फायर ब्रिगेड ने ग्रमाीण लोकाच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

पिंपरा मुंजप्ता मध्ये राहणारे संतोष, संजय, विमल गंगवार, डालचंद, विजय गंगवार आणि मुरादपूर निवासी जगदीश कुमार, बाबूराम यांची शेते आहेत. यामध्ये ऊस पिकवलेला आहे. ऊसाच्या शेतामध्ये अचानक आग लागली. आग भडकल्यानंतर शेतकर्‍यांना ही दुर्घटना घडल्याचे समजले.

शेतात आग लागलेली समजताच गावकर्‍यांनी शेतीकडे धाव घेतली. यानंतर फायर ब्रिगेडलाही सूचना मिळाली. बर्‍याच प्रयत्नान्ती आगीवर ताबा मिळवण्यात यश आले. पण या दरम्यान, शेतकर्‍यांचा 4 एकरातील ऊस जळाला होता. आगीत झालेल्या नुकसानीची तक्रार शेतकर्‍यांनी तहसील प्रशासनालाही दिली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here