खरगपूरमध्ये BCL Industries करणार ग्रीनफील्ड डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन

36

कोलकाता : बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने (BCL Industries) पश्चिम बंगालमधील खरगपूरमध्ये आपली सहाय्यक कंपनी स्वक्ष डिस्टिलरी लिमिटेडच्या ग्रीनफील्ड डिस्टिलरी प्लांटचे उद्घाटन केले जाणार आहे. बीसीएल इंडस्ट्रीजची स्वक्ष डिस्टिलरीमध्ये जवळपास ७५ टक्क्यांची हिस्सेदारी आहे. या नव्या, अत्याधुनिक धान्यावर आधारित डिस्टिलरी युनिटमध्ये ईएनए आणि इथेनॉल असे दोन्हीच्या निर्मितीसाठी २०० केएलपीडीची क्षमता आहे. युनिट स्थापनेचे सर्व काम पूर्ण झाले आहे. शिवाय कंपनी सुरू करण्यासाठीच्या सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये इथेनॉल उत्पादनाची कमतरता आहे. स्वक्ष डिस्टिलरी राज्यात इथेनॉलची मागणी पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरेल. बीसीएल इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे आपल्या भटिंडा येथील आणखी एका युनिटमध्ये २०० केएलपीडी इथेनॉल युनिट स्थापन करून विस्तार केला जाणार आहेय २०० केएलपीडी इथेनॉल प्लांटच्या विस्ताराचे काम गतीने सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here