BCL Industries करणार Reliance Industries ला १०७ कोटी रुपयांचा इथेनॉल पुरवठा

मुंबई : BCL Industries Ltd.ने घोषणा केली आहे की, त्यांना तेल वितरण कंपन्यांकडून (OMCs) पंजाबच्या भटिंडामधील आपल्या उत्पादन युनिटमधून ४.९ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यासाठी २८५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय BCL Industriesच्या डिस्टलरी युनिटला १.६५ कोटी लिटर इथेनॉल रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडला (आरआयएल) पुरवठा करण्यासाठी १०७ कोटी रुपयांची आणखी एक ऑर्डर मिळाली आहे.

BCL इंडस्ट्रीजने आपली सहाय्यक कंपनी Svaksha Distillery Ltd. च्या सोबत, १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी OMCs कडून मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. OMCs नी एक डिसेंबर, २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात विविध ठिकाणी इथेनॉल पुरवठा करण्यासाठी डिस्टिलरींना आमंत्रण दिले होते.

Svaksha डिस्टलरी लिमिटेडला ओएमसी खरगपूर (पश्चिम बंगाल) मध्ये आपल्या उत्पादन युनिटकडून ३.६५ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्यासाठी २१३ कोटी रुपयांची ऑर्डर देण्यात आली आहे. याच्याशिवाय, युनिटला रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडला ८९ लाख लिटर इथेनॉल पुरवठा करण्यासाठी ५६ कोटी रुपयांची ऑर्डरही मिळाली आहे. बीसीएल इंडस्ट्रिजचा शेअर मंगळवारी १.३१ टक्के तेजीने ३९३ रुपयांवर ट्रेड करीत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here