भटिंडा युनिटमधून बीसीएल ( BCL) करणार ४.१० कोटी लिटर इथेनॉल पुरवठा

भटिंडा : इंधन वितरण कंपन्यांनी (ओएमएस) १२ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या निविदा प्रक्रियेत बीसीएल इंडस्ट्रिजने (BCL Industries) भाग घेतला होता. ओएमएसने देशभरातील विविध मोलॅसिस व धान्यावर आधारित प्लांट्सकडून १ डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेबंर २०२२ पर्यंत इथेनॉल पुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. यामध्ये इंधन वितरण कंपन्यांना ३.६० कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्यास बीसीएलला इंडस्ट्रिजला मंजुरी मिळाली असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

याशिवाय, बीसीएलने ०.५० कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल पुरवठ्यासाठीही निविदा दाखल केली आहे. एक डिसेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ओएमएसला एकूण ४.१० कोटी लिटर इथेनॉल पुरवठा केला जाऊ शकतो. याशिवाय, बीसीएलची सह कंपनी स्वक्ष डिस्टिलरी या आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या अंतिम तिमाहीत आपले व्यावसायिक उत्पादन सुरू करेल. आणि या व्यावसायिक उत्पादनानंतर पुरवठा त्वरीत सुरू होईल, अशी अपेक्षा बीसीएलला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here