बीड : जिल्ह्यात दुष्काळाच्या झळांनी उसाचा झाला पालापाचोळा

बीड : अंबाजोगाई तालुक्यात सध्या दुष्काळाच्या तीव्र झळा असून शेतकऱ्यांना पाण्याअभावी उसाचा पालापाचोळा झाला आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील मांजरा नदीचा व कालव्याचा परिसरात सर्वाधिक ऊसाचे प्रमाण मोठया प्रमाणात आसल्याने तो परिसर हा ग्रिन बेल्ट म्हणून ओळखला जातो. बहुतेक शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस शेती करतात. पण आता नदी, नाले आटले असून बोअर, विहिरींनी तळ गाठला आहे. कालवा कोरडा पडला असून मांजरा धरणात पाणीसाठा मृतस्थितीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा कोणताही आधार उरलेला नाही.

सद्यस्थितीत काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या फडावर नांगर फिरवला आहे. तर काही शेतकरी संसाराला आर्थिक हातभार लागेल या आशेवर मिळेल त्या जेमतेम पाण्यावर ऊस शेती जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. आता शेवटच्या टप्प्यात पाणी कमी पडत असल्यामुळे उसाचे पीक शेतात वाळून जात आहे. वळीवर पडला तर पीक शेतकऱ्यांच्या हाती लागेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यावसाय म्हणून सिताफळाची बाग लावली होती. त्यापासुन पाच दहा रुपयाचे उत्पन्न मिळाले. तर कांहीना उत्पन्न मिळणार होते. त्यापूर्वीच तहानलेली बाग वाळून गेली असून बागेचे सरपण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पशुधन सांभाळणेही मुश्किल झाले आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. चारा, पाण्याअभावी दुभती जनावरे कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here