शॉर्ट सर्किटमुळे बगॅस मध्ये आग, तीन तास कारखाना बंद

140

रमाला: रमाला सहकारी साखर कारखान्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे बगॅसमध्ये आग लागली. यामुळे लाखो रुपयांचा बगॅस जळून राख झाला. कर्मचार्‍यांनी पाणी आणि माती टाकून आगीवर नियंत्रण आणले. दरम्यान, कारखाना तीन तास बंद राहीला. कारखाना बंद राहिल्यामुळे शेतकर्‍यांनी गोंधळ केला. मुख्य व्यवस्थापकानी त्यांना समजावून शांत केले.

उत्तम ग्रुप चे साईट इंचार्ज अश्‍विनी तोमर यांनी सांगितले की, रविवारी सहकारी साखर कारखाना रमाला मध्ये बगॅस हटवणार्‍या ट्रॅक्टर मध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे पडलेल्या ठिणगीमुळे बगॅसमध्ये आग लागली. आग लागल्यामुळे कारखान्यामध्ये धावपळ माजली. कर्मचार्‍यांनी कारखाना बंद करुन पाणी व माती टाकून आग नियंत्रीत केली. तोमर यांनी सांगितले की, आग लागण्यामुळे लाखो रुपयांच्या किमतीचे बगॅस जळाले . आणि जवळपास तीन तास कारखाना बंद राहीला. कारखाना बंद झाल्यावर ऊस घेवून आलेल्या शेतकर्‍यांनी गोंधळ करायला सुरुवात केली. मुख्य व्यवस्थापक आरबी राम यांनी गोंधळ करणार्‍या शेतकर्‍यांना शांत करुन कारखाना सुरु केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here