ऊसामध्ये सेंद्रीय शेतीला सुरूवात

बिजनौर : बिलाई-बिजनौर येथील बजाज हिंदुस्थान शुगर लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेतीसाठी जनजागृती सुरू केली आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष अजय शर्मा आणि ऊस विभागाचे महाप्रबंधक परोपकार सिंह, सहायक महाप्रबंधक सिताब सिंह यांनी शेतकरी धर्मेंद सिंह यांच्या शेतापासून सेंद्रीय शेतीची सुरूवात करण्यात आली.

ऊस व्यवस्थापक परोपकार सिंह यांनी सांगितले की, सेंद्रीय शेतीमध्ये शेतातील पोषक घटकांची कमतरता असत नाही. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीला प्राधान्य द्यावे. ऊस पिकामध्ये आंतरपिक म्हणून डाळीचे पिक घेतले जाते. त्याच्यासाठी आवश्यक नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश अशा आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्तताही होते. गोमूत्र, बेसन पीठ, गूळ अशा मिश्रणातून जीवामृत तयार करावे. त्यातून उसावर पडणारा रोग, किटकांपासून संरक्षण मिळते. उसाची मुळे खोलवर जाऊन ऊस पडण्यापासून वाचवता येतो. त्यासाठी बिजप्रक्रियाही अधिक गरजेचे आहे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here