ऊसतोडणी कामगारांचा संप मागे, मजुरीत वाढ

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साखर संघाची बैठक घेण्यात आली. या बैठक़ीमध्ये ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्के वाढ करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे ऊसतोडणी मजुरांच्या मजुरीतही वाढ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयानंतर ऊसतोडणी कामगारांचा संप मागे घेण्यात आला, अशी माहिती संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.
दांडेगावकर यांनी सांगितले की, साखर उद्योगाशी संबंधित या तीन घटकांच्या दराबाबत दर तीन वर्षांनी करण्यात येणार्‍या करारानुसार त्यांचे दर ठरत असतात. यंदाचा करार 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की, गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊस तोडणी मजुरांची नोंदणी करण्यात येईल, तसेच या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतील. नोव्हेंबर अखेर महामंडळाची नोंदणी करुन डिसेंबरपर्यंत कामकाज पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची सूचना यावेळी केली. त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकर्‍यांशीही चर्चा करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
ऊसतोड मजुरांच्या मजुरीत वाढ करण्यात आल्याने त्यांना सरासरी 35 ते 45 रुपयांनी मजुरी वाढवून मिळणार आहे.

ति टनास खालील प्रमाणे दरवाढ होईल.

1) डोकी सेंटर…
सध्याचा दर रुपये = 239.60
+ 14 टक्के रुपये = 33.46
+ 19 टक्के कमिशन = 51.90
एकूण दर रुपये = 325.04
झालेली वाढ प्रतिटन रुपये 34.91

2) गाडी सेंटर…..
सध्याचा दर रुपये = 267.35
+ 14 टक्के वाढ रुपये = 37.43
+ 19% कमिशन = 57.90
एकूण दर रुपये = 362.68
झालेली वाढ प्रतिटन रुपये 38.95

3) टायर गाडी…..
सध्याचा दर रुपये = 208.30
+ 14 टक्के वाढ रुपये = 29.16
+ 19% कमिशन = 45.11
एकूण रक्कम रुपये = 282.57
झालेली वाढ प्रतिटन रुपये 30.34

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here