बेस्ट कार्यकारी संचालक पुरस्काराबद्दल डॉ. यशवंत कुलकर्णी यांचा सत्कार

सांगली : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी कमी वेळात व कमी वयात कामाची वेगळी चुणूक दाखवली. यशस्वी कार्यकारी संचालक असा नावलौकिक त्यांनी मिळवला, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. नाटोली ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने डॉ. यशवंत कुलकर्णी यांना देश पातळीवरील ‘बेस्ट कार्यकारी संचालक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, पुरस्कार तर मिळत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार होत असतात पण ज्यावेळी आपल्याच गावामधील पांढरीमध्ये ग्रामस्थ, मित्रपरिवाराकडून जेव्हा सत्कार होतो त्यावेळी खऱ्या अर्थाने मन सद्गतीत होते त्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने खूप मोठे समाधान मिळते. यावेळी माजी मंत्री विनय कोरे, शिवाजीराव नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, चारुदत्त देशपांडे, राजेंद्र रणवरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here