‘व्हीएसआय’तर्फे सोनहिरा कारखान्यास उत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार प्रदान

पुणे : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) तर्फे २०२२-२३ चा उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, ‘व्हीएसआय’चे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार जयंत पाटील, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम उपस्थित होते.

२०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये कारखान्याने चेअरमन मोहनराव कदम, विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने योग्य आर्थिक नियोजन करुन आर्थिक वर्षात गाळपास आलेल्या ऊसास एफ. आर. पी प्रमाणे संपूर्ण ऊस बिल अदा केले आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व फरक रकमा, व्यापारी बिले वेळेत अदा केली आहेत. विविध बँकांची कर्जे व हफ्ते वेळेत परतफेड केली. इत्यादी बाबींची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here