कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी दिल्या शुभेच्छा

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात २३ व्या मुख्यमंत्र्यांच्या रुपाने शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्वीट करून बसवराज बोम्मई यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बोम्मई यांच्याकडे प्रशासनाचा अनुभव आणि समृद्ध विचार आहेत. ते राज्य सरकारच्या कामांना पुढे नेतील असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.

यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या कार्यकाळाचेही कौतुक केले आहे. येडियुराप्पा यांनी कर्नाटकमध्ये भाजप आणि कर्नाटकच्या विकासासाठी योगदान दिले. कर्नाटकच्या सर्व भागात त्यांनी प्रवास केला. आणि सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनपर ट्वीट केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपले ज्ञान आणि अनुभवातून राज्यातील गरीब आणि शेतकऱ्यांची सेवा करतील. भाजपचा संकल्प पुढे नेतील असे त्यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनीही बोम्मई यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बोम्मई यांची बुधवारी सकाळी अकरा वाजता या पदासाठी निवड करण्यात आली. त्यांनी २३ व्या मुख्यमंत्र्यांच्या रुपाने शपथ घेतली. कर्नाटकच्या राजभवनातील ग्लास हाऊसमध्ये राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here