काटा मारणाऱ्या कारखान्यांना सावधान

उसाच्या एफ आर पी वाढ होत असताना साखर कारखाने वजन काट्यामध्ये बदल करून ऊस उत्पादकांची लूट करत आहेत, अशी वारंवार तक्रार केली जात होती. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून ऊस वजनामध्ये काटा मारणार्‍या कारखानदारावर कडक कारवाई केली जाणार आहे. असा इशारा श्री देशमुख यांनी दिला आहे.

प्रत्येक वर्षी गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये उसाचे वजन नियमानुसार केली जाते, त्यानंतर मात्र ज्यादा उसाचे वजन कमी दाखवून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात होती. वारंवार यावरती सरकार पातळीवर बैठका घेतल्या जात होत्या तसेच वजन मापे विभागालाही याच्यावर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या जात होत्या, मात्र यामध्ये फारसा परिणाम झालेला दिसून येत नव्हता. त्यामुळे यावर्षी मात्र उसाचे वजन कमी दाखवून आर्थिक लूट करणाऱ्या कारखान्यांवर कडक करण्याची नियोजन सहकार विभागाने अवलंबले आहे. याबाबत तशा सूचनाही संबंधित विभागाला दिले असून 1 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या गळीत हंगामामध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here