सावधान, कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा गतीने वाढ

32

जिनेव्हा : कोरोनाचा फैलाव संपला आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर सावधान. कोरोना महामारी पुन्हा गतीने पसरू लागली आहे. खास करुन युरोपात संक्रमण गतीने वाढल्याचे दिसून आले आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जगभरात युरोपमध्ये गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूमध्ये वाढ झाली आहे.
डब्ल्यूएचओने दिलेल्या साप्ताहिक अहवालामध्ये युरोपातील ५३ देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे म्हटले आहे. तर युरोपमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू दरातही १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. येथे १.६ मिलियन नवे रुग्ण आढळले आहे. तर २१,००० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यासात दिवसात ५,१३,००० नवे रुग्ण आढळले आहेत.

युरोपातील अनेक देशांमध्ये नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये रोमानिया, लातविया या देशांचाही समावेश आहे. लातवियामध्ये कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येथे ५६ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर युरोपमध्ये ७४.६ टक्के लसीकरण झाले आहे. रोमानियात रात्री कर्फ्यू जारी करण्यात आला असून हेल्थ कार्ड लागू करण्यात आले आहे. अहवालानुसार रोमानीयात प्रती १० लाख लोकांमध्ये १९.२५ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here