‘भैरवनाथ शुगर’कडून एक लाख मेट्रिक टन उसाचे गाळप : चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत

सोलापूर : मंगळवेढा आणि जत तालुक्याच्या मध्यवर्ती भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा ठरणारा लवंगी येथील भैरवनाथ साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु आहे. कारखान्याने दि. ७ डिसेंबरअखेर १ लाख ३ हजार ७६०.८९ मेट्रीक टन गाळप झाले आहे. गाळप पूर्ण क्षमतेने सुरु असून, कारखान्याने ठरविलेले ४ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट निश्चितच पार करु, असा विश्वास चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.

चेअरमन प्रा. सावंत म्हणाले, या हंगामात गळीतासाठी आलेल्या उसाचा पहिला हप्ता २७२५ रुपयांप्रमाणे ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहेत. ऊस तोडणी वाहतुकीची बिले व कामगारांचे पगार वेळेवर अदा केले आहेत. तरी सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदारांनी जास्तीत जास्त ऊस भैरवनाथ कारखान्याकडे गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here