थकीत ऊस बिलांप्रश्नी भाकियूचे धरणे आंदोलन

मेरठ : ऊस बिले लवकर मिळावे या मागणीसाठी भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाने ऊस भवनासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष ओमवीर सिंह जटपुरा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी ऊस भवनासमोर पोहोचले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चौदा दिवसांत शेतकऱ्यांना उसाचे पैसे देणे गरजेचे आहे. मात्र, ऊस कारखान्याला देऊन काही महिने उलटले तरी पैसे मिळालेले नाहीत. किनौनीच्या बजाज शुगर मिलने शेतकऱ्यांचे गेल्या वर्षाचे पैसेही थकवले आहेत. वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी खते, किटकनाशके घेणेही मुश्किल होत आहे. त्याचा परिणाम पुढील पिकावर होतो.

टिकौला साखर कारखाना, दौराला साखर कारखाना आणि खतौली साखर कारखान्याने ३० एप्रिलपर्यंतच्या उसाचे पैसे दिले आहेत. मात्र बजाज शुगर मिलने अद्याप पैसे दिले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बजाज शुगर मिलविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी पद्मसिंह चौधरी, मनोज गढीना, सनी चौधरी, आनंदपाल सिंह, सोहनवीर सिंह, शिवकुमार राणा, राहुल कुमार, ठाकुर कृष्णपाल आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here